क्रिकेटचं मैदान गाजवून राजकारणाच्या आखाड्यात उतरलेले व तिथंही जम बसवणारे पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू इम्रान खान हे सध्या वेगळ्याच गोष्टीमुळं चर्चेत आले आहेत. ही गोष्ट आहे त्यांच्या तिसऱ्या लग्नाची! सूत्रांच्या माहितीनुसार, इम्रान खान यांनी एक जानेवारी रोजी तिसऱ्या लग्नाचा बार उडवून दिला आहे. त्यांची तिसरी बेगम कोण आहे हे मात्र कळू शकलेलं नाही.'बऱ्याच दिवसांपासून इम्रान खान एका महिलेच्या संपर्कात होते. इम्रान खान यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या खटल्याची सुनावणी सध्या सुरू आहे. या सुनावणीसाठी एक जानेवारी रोजी ते कोर्टात पोहोचले. पण लग्नाचे सोपस्कार उरकूनच ते सुनावणीसाठी आले होते. नव्या पत्नीच्या एका जवळच्या नातलगाकडं हा सोहळा पार पडला,' असं पाकिस्तानी माध्यमांनी म्हटलं आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews